IND vs AUS | केएल राहुलनंतर कोण असेल टीम इंडियाचा नवा उपकर्णधार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेमध्ये सतत प्लॉट ठरणार टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) ला त्याच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने अद्याप दुसऱ्या उपकर्णधारची घोषणा केलेली नाही. बीसीसीआयने आणि निवड समितीने हा निर्णय कर्णधार रोहित शर्मावर सोपवला आहे.

रोहित शर्मा ठरवणार संघाचा उपकर्णधार (Rohit Sharma will decide the vice-captain of the team)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा ठरवणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने मीडियासोबत बोलताना सांगितले की, बीसीसीआयकडून अद्याप उपकर्णधार कोणाला बनवायचं हा निर्णय घेण्यात आलेला नाही. हा अधिकार रोहित शर्माला देण्यात आला आहे. केएल राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, त्याच्या सततच्या खराब परफॉर्मन्समुळे निवड समितीने त्याला या पदावरून हटवले आहे.

गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये केएल राहुलने एकाही डावात 23 पेक्षा जास्त धावा केल्या नाही. जानेवारी 2022 मध्ये त्याने कसोटी सामन्यात अर्धशतक केले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. तेव्हापासून केएल राहुल कसोटी क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरत आहे. त्यामुळे त्याला आता उपकर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून ते 21 फेब्रुवारीपर्यंत खेळला जाणार आहे. तर या मालिकेतील तिसरा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान इंदोर येथे होणार आहे. या मालिकेतील चौथा म्हणजेच अंतिम सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या