Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार विविध भरती प्रक्रिया राबवत असते. अशात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation DRDO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन तसेच ऑफलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या जागांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना पुढील ईमेलवर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्जासाठी ई-मेल

apprentice.acem@gov.in

अधिकृत वेबसाईट

https://www.drdo.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1R-sVlciRwmNmQCSzeKaMbl_QO20E0zRo/view

महत्वाच्या बातम्या