Share

Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर पाळत?; घातपात करत असल्याचा चव्हाणांचा गंभीर आरोप

Ashok Chavan | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या प्रकारणी अशोक चव्हाण यांनी नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली. ‘अज्ञात व्यक्ती माझ्यावर पाळत ठेवत आहे. संबंधित व्यक्ती माझ्यावर पाळत ठेवत असून हे माझा घातपात घडवण्याचं कारस्थान असू शकतं’, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

“माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान”-Ashok Chavan

‘माझ्यावर सतत एक व्यक्ती पाळत ठेवून असते. मी जिथे जिथे जाईन, तिथे मागे येते. मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे’, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून गैरव्यवहार केला जात आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. विशेष म्हणजे या बाबीची कुणकुण त्यांना अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

Ashok Chavan’s Twit

या प्रकरणाची 31 जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.

‘एवढंच नाही तर मुंबई आणि नांदेडमध्ये खासगी तसेच भाडोत्री व्यक्तींमार्फत आपल्यावर पाळत ठेवी जात आहे. सदर अज्ञात व्यक्ती माझ्या गाठीभेटींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे माझा घातपात घडवण्याचे कारस्थान असावे, असा गंभीर संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी’, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Ashok Chavan | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याची धक्कादायक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now