Prakash Ambedkar | “राजकारणात अशी नावं…”; उद्धव ठाकरे अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Prakash Ambedkar | मुंबई : राजकारणात कोणी कोणाला कधी कोणती उपमा देईल सांगता येत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हणाले. यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

काल पुण्यात कोणी आले होते, त्यांनी विचारले महाराष्ट्रात कसे काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ. अशी टीका ठाकरेंनी यांनी नाव न घेता  अमित शहा यांच्यावर केली आहे.

मोगॅम्बो काल म्हणाला की, मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये अमित शहा यांना उत्तर दिलं आहे. “आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे?” असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

“मोगॅम्बोला हेच हवे होते”

“हे मोगॅम्बो आहेत. तुम्ही मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यात मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी. लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत. हिंदू असाल तरी लढा, आमच्यासोबत जे आहेत, तेच आमचे. हिंदू असो की कोणी दुसरा, त्याने फरक पडत नाही”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया (Prakash Ambedkar Reaction on Uddhav Thackeray calling Amit Shah ‘mogambo) 

“राजकारणात अशी टोपण नावं पडतातच. अशी नाव राजकारण्यांनी स्वीकारली पाहिजे, असं माझं वयक्तिक मत आहे. तरच राजकारणातला खेळतेपणा राहतो. नाहीतर याने मला मोगॅम्बो म्हटलं म्हणून त्याला गोळ्या घालायच्या असं व्हायला नको, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

याप्रकरणात मी मध्यस्थी करणार नाही. ज्याचं भांडण त्याने मिटवावं. विधानपरिषदेप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाचा पराभव होईल”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.