Sanjay Shirat | “पिसाळलेल्या कुत्र्याला कोणतं तरी औषध देऊ शांत करु”; शिरसाटांची संजय राऊतांवर जहरी टीका

Sanjay Shirat | मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यानंतर शिंदे यांचा गट आक्रमक झाला आहे. आज (२० फेब्रुवारी) प्रतोद भरत गोगावले यांनी काही आमदारांसह जात शिवसेना विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा घेतला. यावरुन ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाले आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान कलिगतरा रंगला आहे. त्यातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊतांची टीका

“चोरांच्या टोळीने आज कार्यालयावर दावा ठोकला आहे. पण, हे फार काळ चालणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. याला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर 

“आठ दिवसांत संजय राऊतांना याचं उत्तर दिलं जाईल. कुत्र पिसाळलं तर त्याला चावतात का? पिसाळलेल्या कुत्र्याला कोणतं तरी औषध देऊ शांत करु,” अशी टीका संजय शिरसाटांनी केली आहे.

“सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं..” Sanjay Shirsat replied sanjay Raut

“संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं उचित वाटत नाही. निवडणूक आयोगाने अधिकृत पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे. त्यामुळे संजय राऊतांना अपात्र कसं करता येईल, यावर लवकरच निर्णय घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांबद्दल संजय राऊतांनी अपशब्द वापरले आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे,” असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.

“हत्ती चले बाजार आणि कुत्ते भोके हजार”- Sanjay Shirsat 

“संजय राऊतांच्या भाषेला भाषेने उत्तर दिलं असतं. पण, ती आमची संस्कृती नसून, बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण नाही. त्यामुळे हत्ती चले बाजार आणि कुत्ते भोके हजार, अशी संजय राऊतांची अवस्था आहे. चिखलावर दगड मारून ते आमच्या अंगावर उडवून घेण्याएवढं आम्ही मुर्ख नाही,” असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.