Uddhav Thackeray | “सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न, भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही”

Uddhav Thackeray | मुंबई : निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यावर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत  त्यांनी हे वक्तव्य केली. आहे. सुपारी देऊन शिवसेनेची (Shivsena)  हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

“भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही”

“सध्या शिवसेनेसाठी सर्वात कठीण प्रसंग आहे. शिवसेनाप्रमुख गेले तेव्हा जसा प्रसंग होता, तसा प्रसंग आहे. बाळासाहेबांच्य मृत्यूनंतर शिवसेना टिकणार नाही असं बोलले जात होते. पण आपण जिंकलो. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्यचा प्रयत्न केला आहे. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“आता जर जागे नाही झालो तर…”

“आता जर जागे नाही झालो तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल. मिंधे गटाला नाव आणि चिन्हं दिले. कालांतराने त्यांच्यावरील जुन्या केसेस उघडणार आणि शिवसेना संपवायचा प्लॅन आहे. 28 तारखेपर्यंत मशाल हे चिन्ह वापरू शकतो हे चिन्ह जरी काढून घेतले तर अजून दहा चिन्हे माझ्या मनात आहेत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार

येत्या काळात उद्धव ठाकरेंचे प्रमुख नेते महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती मिळत आहे. गाव तालुका जिल्हा पिंजुन काढायचे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिले आहे. आधी नेते दौरा करणार  त्यानंतर उद्धव आणि आदित्य ठाकरे जाणार दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.  विभागवार ठाकरेंच्या प्रमुख नेत्यांचे दौरे ठरणार आहे. दौऱ्यांवर जाऊन ठाकरे गट आपला गड मजबुत ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button