Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बियाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने मिळतात ‘हे’ फायदे

Pumpkin Seeds | टीम महाराष्ट्र देशा: भोपळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया आपल्या त्वचेसाठी (Skin) खूप फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, अँटिऑक्सिडंट यासारखे घटक आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बियाच्या मदतीने त्वचा मुलायम आणि चमकदार होऊ शकते. यासाठी तुम्हाला भोपळा बारीक करून घ्यावा लागेल. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मध आणि ॲपल व्हिनेगर मिसळून घ्यावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावे लागेल. आठवड्यातून दोन वेळा हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने पुढील फायदे मिळू शकतात.

चेहऱ्याची चमक वाढते (The glow of the face increases-Pumpkin Seeds Benefits)

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. भोपळ्याच्या बियामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बियाचा फेसपॅक लावल्याने त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचा फेसपॅक वापरू शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर होतात (Removes blemishes on the face-Pumpkin Seeds Benefits)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी भोपळ्याच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. त्यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोनदा भोपळ्याच्या बियांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा लागेल. भोपळ्याच्या बियांमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या फेसपॅकचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारू शकतो.

चेहरा मऊ होतो (The face becomes soft-Pumpkin Seeds Benefits)

भोपळ्याच्या बिया त्वचेसाठी डीप कंडिशनर आणि मॉइश्चरायझर म्हणून काम करतात. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज असली, तरी भोपळ्याच्या बियापासून बनवलेला फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. या फेसपॅकच्या मदतीने त्वचा मऊ होऊ शकते. त्याचबरोबर हा फेसपॅक वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते.

भोपळ्याच्या बियाचा फेसपॅक वापरल्याने त्वचेला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-For Oily Hair)

तेलकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल कोमट करून घ्यावे लागेल. साधारण दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला एक तास खोबरेल तेल केसांना राहू द्यावे लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमची केस शाम्पूने धुवावे लागतील. नियमित असे केल्याने तेलगट केसांची समस्या दूर होऊ शकते.

कोरफड (Aloevera-For Oily Hair)

कोरफडीच्या मदतीने तेलकट केसांची समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने केसांना मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते आणि केस चमकदार होतात.

ग्रीन टी (Green tea-For Oily Hair)

ग्रीन टी केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला ग्रीन टीच्या दोन ते तीन बॅग्स पाण्यात उकळून घ्याव्या लागतील. त्यानंतर ते पाणी कोमट झाल्यावर साधारण अर्धा तास तुम्हाला ते केसांमध्ये लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. ग्रीन टीच्या मदतीने केसातील चिकटपणा दूर होतो आणि केस चमकदार होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.