Ramdas Kadam | “भास्कर जाधव बांडगूळ, त्याची लायकी नाही तो नाच्या आहे, राजकारणातून..”; रामदास कदम आक्रमक

Ramdas Kadam | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी खेडमधील गोळीबार मैदानावर जाहीर सभा होणार आहे. शिंदे गटाकडून या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. या सभेबाबत बोलताना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रामदास कदम हे ‘टिव्ही ९’ मराठी बोलताना त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका करत त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

Ramdas Kadam Criticize Bhaskar Jadhav

“खेड येथे होणारी सभा ऐतिहासिक सभा होईल. आम्ही फक्त मतदार संघातील लोकांना बोलवणार आहे. अफझल खान कसा सगळं सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता तसं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना उद्धव ठाकरे घेऊन आले होते. ‘मातोश्री’वर जोरदार बैठका घेतल्या जात होत्या. प्रत्येकाला विचारलं जात होतं तू किती माणसं आणणार? त्यामुळे आमच्या सभेला त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी राहील”, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

“भास्कर जाधव बांडगूळ, त्याची लायकी नाही तो नाच्या आहे”

“उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मला गुहागर येथे उद्धव ठाकरे यांनीच पाडले. मी गुवाघरमध्ये गाफील राहिलो. भास्कर जाधव यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. योगेश कदमचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न झाले पण ते माझ्यापुढे यशस्वी झाले नाही. पण आता 2024 ला भास्कर जाधवला आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. बांडगूळ आहे भास्कर जाधव. त्याची लायकी नाही तो नाच्या आहे” अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Ramdas Kadam Challenge To Bhaskar Jadhav 

“भास्कर जाधवला माझे खुलं चॅलेंज आहे. 2024 ला तू आमदार होऊन दाखव. योगेश कदमला पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण त्याच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी योगेश कदम संपणार नाही, आम्ही ठरविले आहे भास्कर जाधव हा नाच्या असून त्याला मी राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही. काहीही झालं तरी मी भास्कर जाधवला आमदार होऊ देत नाही” असा इशाराच कदम यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे.

“उद्धव ठाकरे अफझलखानासारखे माझ्यावर चालून आले होते. 19 तारखेला ठाकरेंना कळेल की कोकण माझ्याच पाठीशी आहे. भास्कर जाधवांना मी जिंकवलं, पण ते सापासारखे दंश करायला उलटतात”, असंही रामदास कदम म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.