Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), यवतमाळ यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या 93 रिक्त जागा (93 vacancies of various posts)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 93 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)/ Medical Officer (MBBS) 25 जागा, वैद्यकीय अधिकारी (पुरुष) / Medical Officer – Male (RBSK) 02 जागा, वैद्यकीय अधिकारी (महिला) / Medical Officer – Female (RBSK) 01 जागा, ऑडिओमेट्रिक / Audiometric (NPPCD) 01 जागा, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक / Instructor for Hearing Impaired Children (NPPCD) 01 जागा, दंत आरोग्यतज्ज्ञ / Dental Hygienist (NOHP) 01 जागा, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / Clinical Psychologist (NMHP) 01 जागा, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता / Psychiatric Social Worker (NMHP) 01 जागा, फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist (NCD) 01 जागा, दंतवैद्य / Dentist (NOHP) 02 जागा, STLS -(RNTCP) 01 जागा, स्टाफ नर्स / Staff Nurse 50 जागा, स्टाफ नर्स NUHM पुसद / Staff Nurse NUHM Pusad 02 जागा, लॅब टेक्निशियन एनयूएचएम यवतमाळ / Lab Technician NUHM Yavtmal 03 जागा आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) / Full-time Medical Officer (MBBS) 01 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 मार्च आणि 24 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

जाहिरात पाहा (View ad)

http://www.zpyavatmal.gov.in/pdfdocs/chalughadamodi/NHM_Jahirat_23-24.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.zpyavatmal.gov.in/

महत्वाच्या बातम्या

Back to top button