Uddhav Thackeray | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक केल्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाने वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
अनिक्षा जयसिंघानीया (Aniksha Jaysinghania) हिचे वडील अनिल जयसिंघानीया (Anil jaysinghania) यांचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनिल जयसिंघानीया यांनी 2014 मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.
Mumbai Police Arrest Aniksha Jaisinghani
अनिल जयसिंघानीया यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रक्षप्रवेश केलेला. या पक्षप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हे फोटो कितपत सत्य आहेत याबाबतची माहिती लवकरच समोर येईल. मात्र या फोटोंमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिक्षा जयसिंघानीया ही 2015ला अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आल्या होत्या. पण त्यानंतर काही वर्ष ती अमृता यांच्या संपर्कात आली नाही. दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनिक्षा 2021 मध्ये पुन्हा अमृता यांच्या संपर्कात आली. मी ड्रेस डिझायनर आहे, तुम्ही माझे ड्रेस वापरुन बघा. मी आर्टिफिशअल ज्वेलरीचं काम करते. त्यांनी हळूहळू अमृता यांचा विश्वास संपादीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काही व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप बनावट स्वरुपामध्ये बनवलेल्या होत्या. त्या सगळ्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांना पाठवण्यात आल्या होत्या. या सगळ्या क्लिप्स डिलीट करण्यासाठी तिने अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा संबंधित क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी अमृता फडणवीस यांना देण्यात आली होती, असा खुलासा पोलिसांनी आज न्यायालयात केला आहे.
Sushma Andhare’s Reaction
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचाही कुणासोबतचा फोटो दाखवून चर्चित चर्वण करणाऱ्या आणि स्क्रिप्टेड स्टोरी वर काम करणाऱ्या भक्तगणांनी हा फोटो नीट बघून घ्यावा आणि आपल्या सावकाशीने प्रतिक्रिया द्याव्या” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. सोबत अमृता फडणवीस आणि दानिश हिंगोरा यांचा एकत्र फोटो त्यांनी शेअर केला आहे.
कुणाचाही कुणासोबतचा फोटो दाखवून चर्चित चर्वण करणाऱ्या आणि स्क्रिप्टेड स्टोरी वर काम करणाऱ्या भक्तगणांनी हा फोटो नीट बघून घ्यावा आणि आपल्या सावकाशीने प्रतिक्रिया द्याव्या. @AUThackeray @OfficeofUT @SaamanaOnline @priyankac19 @iambadasdanve @abpmajhatv pic.twitter.com/0orgzyXkBV
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 17, 2023
महत्वाच्या बातम्या-
- Devendra Fadnavis | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
- Nana Patole | “राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवलेत”; सरन्यायाधिशांना ट्रोल करण्यावर नाना पटोलेंची जहरी टीका
- H3N2 | धक्कादायक! पुण्यात H3N2 विषाणूचे 15 दिवसात 46 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू; महापालिकेचे सतर्कतेचे आवाहन
- Ajit Pawar | “कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात”; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे
- Sanjay Raut | “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मख्खमंत्री, खरे चालक तर देवेंद्र फडणवीस”; संजय राऊतांची बोचरी टीका