Devendra Fadnavis | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी

Devendra Fadnavis | मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हाक ऐकली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी त्यावेळी दिली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं.

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कांदे उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. पण सरकारने यामध्ये आणखी 50 रुपयांची वाढ केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis gave good news for cotton farmers

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्रात अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्कला मान्यता दिली. मागच्या काळात हा प्रस्ताव आम्ही पाठवला होता. आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. आता टेक्स्टाईल पार्क मंजूर झालाय. मागच्या काळात आपण अमरावतीत टेक्स्टाईल पार्कची इको सिस्टिम आधीच तयार केली आहे. एक मोठा टेक्सटाईल झोन तयार केला आहे. अनेक कंपन्या तिथे आल्या आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

“आता हा टेक्सस्टाईल पार्क आल्याने दहा हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षपणे असा तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समृद्धी येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा आपला कॉटन बेल्ट आहे. त्यामुळे हा पार्क आल्यानंतर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायादा मिळेल. खरं म्हणजे या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button