Nana Patole | “राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवलेत”; सरन्यायाधिशांना ट्रोल करण्यावर नाना पटोलेंची जहरी टीका

Nana Patole | मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी  काल (१६ मार्च) संपली आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सत्ताधाऱ्यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर सरन्यायाधीश सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर आणि भाजप जहरी टीका केली आहे.

After trolling the Chief Justice, Nana Patole criticizes BJP

“केंद्र सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही. राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवले आहेत. ट्रोलिंगसाठी त्यांना पैसे दिले जातात. म्हणूनच आमच्या काही खासदारांनी राष्ट्रपतींकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात लगबग सुरू आहे. आमच्या लोकांनी सांगितलं की, मंत्रालयातील लगबग फारच वाढली आहे. जुन्या फाईल्स पटापट काढल्या जात आहेत. त्यावरुन असं वाटतंय की सत्ताधाऱ्यांना काहीतरी चाहूल लागली आहे”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

Nana Patole Criticize BJP 

“राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांच्छनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहीत असून, सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिंमत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले आहेत”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

“भाजप सत्तापिपासू, केंद्र सरकारवर कोणाचाच विश्वास नाही”

“भाजप किती सत्तापिपासू आहे, याचा अंतच नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडताना सुरतेपासून गुवाहाटीपर्यंत काय-काय झाले, राज्यपालांनी पदाचा कसा दुरुपयोग केला, या सर्व घटना आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी जे काही प्रश्न विचारले, निरीक्षणे नोंदवली यावर त्यांना ट्रोल केले गेले, हा ट्रोल करण्याचा प्रकार गंभीर आहे. केंद्रातील सरकारवर कोणाचाच विश्वासच राहिलेला नाही म्हणूनच राष्ट्रपतींकडे दाद मागण्यासाठी काँग्रेस खासदार गेले आहेत”, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.