Ajit Pawar | “कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात”; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाल्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस, बाजारभाव आणि पंचनामे न झाल्याने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

Ajit Pawar Criticize Abdul Sattar 

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने राज्यात हवामान खात्याने ‘येलो सिग्नल’ दिला आहे. त्याचप्रमाणे पिकांना भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवेंचनात अडकला आहे. अशी परीस्थिती असताना राज्य कृषीमंत्री म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले नाही’, कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन अजित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Ajit Pawar criticize State government regarding farmers 

“शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे. आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून, २० मार्चपासून संपूर्ण राज्याला ‘यलो अलर्ट’ तर ११ जिल्ह्यांना ‘ऑरेज ॲलर्ट’ देण्यात आलेला आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करुन ‘अकलेचे तारे’ तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत” असं म्हणत अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अजित पवारांचा गंभीर आरोप

“राज्यात ५, ६ आणि ७ मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत, त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे”, असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-