Acidity | ॲसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Acidity | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ॲसिडीटीची समस्या खूप सामान्य होते. या ऋतूमध्ये तेलगट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केले तर बद्धकोष्ठता, पोट दुखी, पोट फुगणे, ॲसिडीटी इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे ॲसिडीटीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने ॲसिडीटी सहज दूर होऊ शकते.

जिरे (Cumin-For Acidity)

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये जिरे सहज उपलब्ध असतात. आम्लपित्त, पोट दुखी, बद्धकोष्ठता या समस्या दूर करण्यासाठी जिरे उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर ॲसिडीटीच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिरे एक रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्ही भाजलेले जिरे काळ्या मिठासोबत खाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाण्यात मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

ओवा (Owa-For Acidity)

ओव्यामध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळून येतात, जे ॲसिडीटीपासून आराम देतात. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि आयरन यासारखे पोषक घटक आढळून येतात. ॲसिडीटीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही भाजलेल्या ओव्याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर पचनाच्या समस्यांसाठी तुम्ही कोमट पाण्यासोबत ओवा खाऊ शकतात.

पुदिना (Mint-For Acidity)

पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर ॲसिडीटी, पोट दुखी आणि पोट फुगणे या समस्यांवर मात करण्यासाठी पुदिना उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला पुदिन्याची पाने बारीक करून पाण्यामध्ये मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. या पेयाचे सेवन केल्याने तुम्हाला ॲसिडीटीपासून आराम मिळू शकतो.

ॲसिडीटीच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही वरील पर्यायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही लवंगाचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

  • ॲसिडीटी (Acidity) झाल्यास तुम्ही दोन-तीन लवंग खाऊ शकतात. तुम्ही चॉकलेटप्रमाणे लवंग हळूहळू चघळू शकतात. लवंगाच्या रसाने तुम्हाला काही मिनिटात आराम मिळू शकतो.
  • ॲसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक लवंग टाकून ते पाणी उकळून घेऊ शकतात. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्ही त्याचे सेवन करू शकतात. लवंग पावडर गरम पाण्यात टाकून प्यायल्याने ॲसिडीटी(Acidity) च्या समस्येपासून आराम मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अर्ध चमचा मध देखील मिसळू शकतात.
  • त्याचबरोबर ॲसिडीटीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही एक लवंग, एक इलायची आणि चार तुळशीची पाने बारीक करून पाण्यात उकळून घेऊ शकतात. हे पाणी थोडे थंड झाल्यावर तुम्ही त्याचे चहाप्रमाणे सेवन करू शकतात. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला ॲसिडीटी (Acidity) पासून आराम मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.