Sanjay Raut | “अरे मिंधे-बिंधे शिवसेना असते का? शिवसेना काय आहे, हे…”; संजय राऊतांचं आव्हान

Sanjay Raut | मालेगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी करत भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांची 26 मार्च रोजी मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील आमदारांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे.

“ते आमदारांना पाडण्यासाठी नाही, तर कायमचं गाडण्यासाठी येत आहेत”

“उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी मी येथे आलोय. खरं तर, आमदारांना पाडण्याची गरज नाही. तो आधीच पडलेला आहे. उद्धव ठाकरे इकडे येतायत, ते आमदारांना पाडण्यासाठी नाही, तर कायमचं गाडण्यासाठी येत आहेत. मालेगावातून महाराष्ट्राला संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे येथे येत आहेत. मालेगावची निवड त्यासाठीच केली आहे. महाराष्ट्र अखंड आहे. जात-पात आणि धर्मभेद गाडून हा महाराष्ट्र उभा आहे. त्यासाठीच मालेगावची निवड केली आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“अरे मिंधे-बिंधे शिवसेना असते का? शिवसेना एकच”

“अरे मिंधे-बिंधे शिवसेना असते का? शिवसेना एकच आहे बाळासाहेब ठाकरेंची… शिवसेना एकच उद्धव ठाकरेंची… तुम्ही कागदावर आमची शिवसेना काढून घेतली. मग आमच्यासमोर, व्यासपीठावर आणि बाहेर काय आहे? शिवसेना काय आहे, हे 26 तारखेला बघा. गेल्या 55 वर्षांपासून ही शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली आहे. त्यांनी तुमच्या आमच्यासाठी शिवसेना निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं नव्हतं. मराठी माणसाला या महाराष्ट्रात आणि मुंबईत सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावं, या एका जिद्दीपोटी शिवसेना निर्माण केली” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut comment on Shinde Group’s MLA

“गेली चार-पाच दिवस माझी प्रकृती खरोखर बरी नाही. पण आज येथे यायचं ठरलं होतं. म्हणून मी टाळलं नाही. कारण मला आज मालेगावात यायचंच होतं. जेव्हा मी एखाद्याला गाडायचं ठरवतो, त्याला गाडतोच. आज त्याची सुरुवात झाली आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“परवा मला दिल्लीत एका मुलाखतीत प्रश्न विचारला, हे गद्दार शिवसेना भवनावर चाल करून येणार आहेत. मी म्हटलं येऊ द्या… त्यांना 20 फूट जमिनीच्या आतमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. 20 फूट जमिनीच्या खाली गाडू… ही धमकी आहे का? असं विचारल्यावर मी म्हटलं… होय, धमकी आहे असं समजा. ही नुसती धमकी नाही. तर ही धमकी कृतीमध्ये उतरवण्याची क्षमता आमच्यात आहे” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.