Sanjay Raut | भाजपकडून शिंदे गटाला फक्त 48 जागा, राऊत म्हणाले; “हीच त्यांची लायकी”

Sanjay Raut | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यात त्यांनी भाजप 240 जागा लढेल आणि शिंदे गटाला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याचं सांगितलं आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गट आणि भाजपवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी शिंदे गटाचे वाभाडेच काढले आहेत.

“उद्या भाजपवाले त्यांना 5 जागाही देतील. हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने 2014 मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर 40-45 जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही”, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटाचे वाभाडे काढले आहेत.

“म्हणूनच भाजपने शिवसेना तोडली”

“राज्याचा भाजपचा प्रदेशाध्यक्ष सांगतो, तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ उद्या ते यांना 5 जागा सुद्धा देतील. हीच त्यांची लायकी आहे. त्यामुळेच भाजपने शिवसेना तोडली. त्यांना या महाराष्ट्रात शिवसेनेचा दरारा संपवायचा होता”, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut on CM Eknath Shinde

“शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळला ते बघा. आमचं आम्ही बघू काय करायचं ते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते गटातटाकडे पाहत आहेत. ते पाहण्यात त्यांचा वेळ जात आहे. मुळात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का? त्यांना शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्नतरी माहिती आहेत का? तर दुर्देवाने याचं उत्तर नाही असे आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ सुप्रीम कोर्टाच्या निकालाची काळजी आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल सुद्धा विकत घेता येईल का? यावर त्यांचा विचार सुरू आहे. पण आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राला न्याय मिळेल”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-