Share

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती; ‘या’ दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published On: 

Maharashtra Rain Update showing heavy rainfall and orange alert map in Vidarbha region

जुलै महिन्यात धुमाकूळ घालणारा पाऊस अचानक गायब कुठे झाला? सध्या राज्यातील बहुतांश भागांत पावसाने भलतीच विश्रांती घेतली आहे. पण हवामान खात्याने दिलेला नवा इशारा थक्क करणारा आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरीही सोमवारी काही भागांत पावसाचा जोरदार तडाखा बसू शकतो.

Maharashtra Rain Update: गोंदिया आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस

यंदा हवामान बदलाचे अत्यंत विचित्र परिणाम संपूर्ण जगासह महाराष्ट्राला सहन करावे लागत आहेत. कुठे कमी कालावधीत अतिवृष्टी अन् पूरस्थिती, तर कुठे पाऊस नसल्याने दुष्काळ. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत तर अजूनही पावसाची मोठी तूट आहे.

दुसरीकडे, पूर्व विदर्भात मात्र पावसाचा प्रभाव कायम आहे. गोंदिया आणि गडचिरोली भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी पाऊस चांगलाच धुमाकूळ घालतोय. शनिवारी सकाळी ते रविवारी सकाळपर्यंत गोंदियात तब्बल ६७.३ मिमी तर गडचिरोलीत २१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकण प्रदेशात गेल्या दोन महिन्यांत चांगला पाऊस झाला. तिथेही आता पावसाचा जोर मंदावला आहे. हवामान विभागाने आज गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना थेट मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

याशिवाय सिंधुदुर्ग, पुणे व नाशिकचा घाट परिसर, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूरमध्येही वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही