Share

महाराष्ट्र पावसाने झोडपला: हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’, पुढील २४ तास राज्यासाठी धोक्याचे!

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यवतमाळमध्ये शाळांना सुट्टी, तर अमरावतीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Published On: 

Maharashtra rain alert flood situation in villages

तुम्ही आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात का? थोडं थांबा, कारण पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं असून, पुढील २४ तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे ठरणार आहेत.

भारतीय हवामान विभागाने (IMD red alert) आज राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये थेट अतिवृष्टीचा इशारा (Maharashtra Rain Alert) दिला आहे. पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Update

यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा थेट रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे आदेश देत सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे.

धामक गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दुकाने आणि नागरिकांच्या घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलैच्या अखेरीस पावसाने दमदार कमबॅक केले आहे. नंदुरबारमध्ये सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर आता जोरदार मुसळधार सुरू आहे. वाशिममध्येही रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली.

वाशिममधील वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मालेगाव आणि मानोरा या सर्व सहा तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. सुदैवाने अजून कुठेही पूरस्थिती नसली तरी, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

त्यामुळेच हवामान विभागाने ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, सातारा आणि जळगावमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही