Share

रेवती सुळेंच्या लग्नात पार्थ पवारांसोबत आलेली ‘ती’ काश्मिरी तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीच्या लग्नात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत आलेल्या कायनात धर या काश्मिरी तरुणीची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे.

Published On: 

Revati Sule wedding guest Kainat Dhar with Parth Pawar in Mumbai.

🕒 1 min read

मुंबई – भारताच्या राजकारणातील सर्वात वजनदार कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबातील एका शाही विवाहसोहळ्याची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत मुंबईत अत्यंत दिमाखात पार पडला. या सोहळ्याला देशातील दिग्गज राजकारणी, उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण, या सगळ्या गर्दीत एका अशा चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्याची चर्चा आता थेट सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत रंगली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासोबत या लग्नसोहळ्यात एक सुंदर तरुणी एकत्र पोहचली. थेट पवार कुटुंबासोबतच या विवाहसोहळ्यासाठी तिची एंट्री झाल्यामुळे ‘ही तरुणी नेमकी आहे तरी कोण?’, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला.

कायनात धर आणि पवार कुटुंबाचे संबंध (Who is Kainat Dhar)

या तरुणीचे नाव कायनात धर (Kainat Dhar) असे असून ती मूळची काश्मीरची आहे. सध्या ती दिल्लीत वास्तव्यास असल्याचे समजते. पवार कुटुंबाशी तिचे अतिशय जवळचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. काही महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवार जेव्हा काश्मीर दौऱ्यावर गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी कायनातच्या घरीच मुक्काम केला होता.

विशेष म्हणजे पार्थ पवार आणि कायनात धर यांना एकत्र पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शनासाठी हे दोघे एकत्र गेले होते, ज्याचे फोटोही समोर आले होते. पवार कुटुंबाच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात आणि सुख-दुःखात कायनात नेहमीच सोबत असते. या शाही लग्नातही ती अतिशय सुंदर अशा पारंपरिक पेहरावात दिसून आली. सध्या इंटरनेटवर नेटकरी तिच्याबद्दल अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, या हाय-प्रोफाइल लग्नाला काँग्रेस नेते राहुल गांधी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मुकेश अंबानी, गौतम अदानी, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सारख्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. या भव्य सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही