🕒 1 min read
वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना एखाद्या अभिनेत्रीने मृत्यूला कवटाळावं, यापेक्षा मोठा धक्का तो काय असू शकतो? टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिच्या आत्महत्येने सध्या मनोरंजन विश्व सुन्न झालंय. पण आता तिच्या मृत्यूबाबत एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
१४ जून रोजी संचिताने राहत्या घरी गळफास घेत स्वतःची जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर ‘साजन घर’ मालिकेतील तिचा को-स्टार उज्वल शर्मा याच्यासोबत तिच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण आता खुद्द उज्वलनेच यावर मौन सोडत एक अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली आहे.
Sanchita Ugale Death
उज्वल शर्माने ‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अफेअरच्या सर्व अफवा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या आहेत. तो म्हणाला, “आमच्यात असं काहीही नव्हतं. उलट, ती दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.”
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून संचिताशी आपला कोणताही संपर्क नव्हता, असंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. उज्वलने पुढे सांगितलं की, “तिच्या एक्स-बॉयफ्रेंडमुळे ती अत्यंत कठीण परिस्थितीतून आणि मानसिक तणावातून जात होती. तिची ही अवस्था पाहून प्रॉडक्शन हाऊसनेही तिला उपचारांसाठी मदत केली होती.”
दुसरीकडे, संचिताच्या अचानक जाण्याने तिचे इतर सहकलाकारही मोठ्या धक्क्यात आहेत. ‘साजन घर’मध्ये काम करणाऱ्या उत्कर्ष कोहलीने दुःख व्यक्त करताना सांगितलं की, संचिता स्वभावाने अतिशय आनंदी होती. पण ती काही वैयक्तिक समस्यांचा सामना करत असल्याचं त्याला जाणवलं होतं.
संचिताने ‘कुमकुम भाग्य’, ‘साजन घर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांसह विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ चित्रपटातही काम केलं होतं. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- अरबाझ खानच्या कारमध्ये अनोळखी व्यक्तीची घुसखोरी; भररस्त्यात गोंधळ, सुरक्षेत मोठी चूक?
- ठाकरांच्या खासदारांना प्रत्येकी १५ कोटी? संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने महाराष्ट्राचे राजकारण तापले
- ठाकरे गटाचे ६ खासदार नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












