Share

अरबाझ खानच्या कारमध्ये अनोळखी व्यक्तीची घुसखोरी; भररस्त्यात गोंधळ, सुरक्षेत मोठी चूक?

कोलकात्यात अरबाझ खानच्या कारमध्ये एका अनोळखी व्यक्तीने घुसखोरी केल्याने मोठा गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी वेळीच कारवाई करत अरबाझला सुखरूप बाहेर काढले.

Published On: 

Arbaaz Khan Viral Video bodyguard pulling an unknown man from his car

🕒 1 min read

सेलिब्रिटींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्यावर काय घडू शकतं, याचा एक धडकी भरवणारा प्रकार नुकताच समोर आला आहे. तुम्ही विचार करा, एखादा सुपरस्टार इव्हेंट संपवून बाहेर येतो आणि त्याच्या गाडीत आधीच एक अनोळखी व्यक्ती आरामात बसलेली असते… धक्कादायक वाटतंय ना?

नेमकं हेच घडलंय अभिनेता अरबाझ खान (Arbaaz Khan) याच्यासोबत. कोलकात्यात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या अरबाझला या विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Arbaaz Khan Viral Video

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाझ कोलकाता येथे एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो जेव्हा बाहेर आला, तेव्हा एक अनोळखी व्यक्ती सुरक्षा घेरा तोडून त्याच्या कारजवळ पोहोचला. त्याने थेट गाडीचा दरवाजा उघडला आणि आत जाऊन बसला. हा सर्व प्रकार इतक्या अचानक घडला की खुद्द अरबाझही क्षणभर गोंधळून गेला.

गाडीत बसलेला तो माणूस काही केल्या बाहेर यायला तयार नव्हता. तिथे बघ्यांची मोठी गर्दी उसळली आणि अचानक ‘मारा.. मारा..’ असा आरडाओरडा सुरू झाला. हा सगळा गोंधळ पाहून नेमकं काय चाललंय हे अरबाझलाही समजेना.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बाऊन्सर्सनी तात्काळ ॲक्शन घेतली. त्यांनी त्या व्यक्तीला जबरदस्तीने गाडीबाहेर खेचलं आणि त्याची चांगलीच धुलाई केली. सिक्युरिटी टीमने सर्वकाही कंट्रोलमध्ये आणत त्यानंतर अरबाझला सहीसलामत तिथून रवाना केलं.

गेल्या ३० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेला अरबाझ खान केवळ अभिनेताच नाही, तर निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जातो. नुकताच तो १६ जानेवारीला रिलीज झालेल्या सुजाद इक्बाल खान दिग्दर्शित ‘बिहू अटॅक’ या ॲक्शन ड्रामा चित्रपटात दिसला होता.

या चित्रपटात त्याच्यासोबत डेझी शाह आणि राहुल देव यांच्याही भूमिका आहेत. पण या ताज्या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही