🕒 1 min read
राजकारणात कधी काय होईल आणि कोणता दिग्दर्शक कोणत्या नेत्यावर सिनेमा काढेल, हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. ‘धर्मवीर’सारख्या सुपरहिट सिनेमानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे आता कुणावर सिनेमा काढणार? हा प्रश्न अनेकांना पडला होता.
अखेर तरडेंनी स्वतःच यावर मोठा गौप्यस्फोट केला असून, थेट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे राजकीय आणि मनोरंजन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Pravin Tarde Ajit Pawar
लवकरच त्यांचा ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण सध्या जोरदार चर्चा रंगलीय ती Pravin Tarde On Ajit Pawar Biopic या विषयाची. ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’ च्या यशानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्याला बायोपिकसाठी गळ घातल्याचा खळबळजनक खुलासा तरडेंनी यावेळी केला.
“अनेक पुढाऱ्यांनी मला कोरे चेक आणि अफाट बजेटच्या ऑफर दिल्या. पण मी त्या सगळ्या परत पाठवल्या,” असं सांगत तरडेंनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आनंद दिघे साहेबांवर सिनेमा करणं ही एक भावनिक जबाबदारी होती, त्यामुळे पैशांसाठी कुणावरही तसाच सिनेमा करणं सोपं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“मी दादांना खूप जवळून पाहिलंय. सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा मंत्री मी त्यांच्या रूपात पाहिलाय. त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, वेग, दबाव आणि कामाचा ध्यास हा नक्कीच सिनेमाचा विषय होऊ शकतो.”
मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही आता त्यांच्या धावत्या पावलांची सवय झाली असेल, असं म्हणत त्यांनी दादांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक केलं. प्रवीण तरडेंच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर आता खरोखरच अजितदादांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा मोठ्या पडद्यावर कधी धडकणार, याकडेच संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी ते गौतमी पाटील; ‘त्या’ गाण्यांनी उडवून दिलीय खळबळ!
- देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता? RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा म्हणाले…..
- राकेश-तेजश्रीच्या लग्नाची चर्चा, बहिणीने अखेर सत्य सांगितलंच; आईलाही बसला होता मोठा धक्का!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












