Share

सोन्या चांदीसह अन्नधान्याच्या किंमतीत वाढ का होतेय? RBI चा महागाईबाबत मोठा खुलासा

रिझर्व्ह बँकेच्या मते सध्याची महागाई अन्नधान्यापेक्षा सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे वाढत आहे, मात्र लवकरच अन्नधान्याचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

Published On: 

RBI News: सोन्या-चांदीमुळे महागाई वाढली; RBI चा खुलासा!

अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे भाव वाढले की सामान्यांचे बजेट कोलमडतं, पण सध्याच्या महागाईला कारणीभूत ठरलेली गोष्ट काही वेगळीच आहे, असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच एक धक्कादायक खुलासा केला असून, महागाई वाढण्यामागे डाळ-तांदूळ किंवा कांदा-बटाटा नसून भलतंच कारण समोर आलं आहे.

फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने स्पष्ट केलं की, सध्या महागाईवर जो दबाव दिसतोय, तो भाज्यांपेक्षा सोने आणि चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे जास्त आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ थेट ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) परिणाम करत आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, सोने वगळता डिसेंबरमध्ये कोअर इन्फ्लेशन केवळ २.६ टक्के इतके होते, जे सुरक्षित मानले जाते. मात्र, सोन्या-चांदीचा समावेश करताच हे चित्र पूर्णपणे बदलून महागाई वाढलेली दिसते.

Rbi On Gold Silver Price Inflation

सामान्य लोकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, पुढच्या काळात अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगामातील चांगलं पीक, सरकारचा बफर स्टॉक आणि रब्बीची दमदार पेरणी यामुळे गहू, तांदूळ आणि डाळींचे दर भडकणार नाहीत, असा अंदाज बँकिंग क्षेत्रातील सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

जागतिक बाजारपेठेतील युद्धजन्य परिस्थिती आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली आहे. डॉलरचं मूल्य आणि आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही ‘खळबळ’ उडाली आहे. थोडक्यात सांगायचं तर, सध्या महागाईची झळ स्वयंपाकघरापेक्षा दागिन्यांच्या दुकानातून जास्त पोहोचतेय, असं आरबीआयचं म्हणणं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही