🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी- राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर आता राजकारण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे ( Rohini Khadse ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे म्हणाल्या, “मला महिला आयोगाच्या बैठकीचं निमंत्रण आलं असलं तरी मी जाणार नाही. कारण ही बैठक उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जेव्हा प्रत्यक्ष काम करायची गरज होती, तेव्हा महिला आयोगाने दुर्लक्ष केलं. आता फक्त विरोधकांचा दबाव असल्यामुळे ही ‘सौजन्य’ बैठक बोलवली आहे.”
Rohini Khadse Demands Rupali Chakankar’s Resignation
रोहिणी खडसेंचे गंभीर आरोप:
- रूपाली चाकणकर पूर्णवेळ महिला आयोगाचं काम करत नाहीत. त्या पक्षकार्याला प्राधान्य देतात, आयोग दुय्यम ठिकाणी आहे.
- तक्रारींचा निपटारा ईमेलवरच केला जातो, प्रत्यक्ष कारवाई नाही.
- वैष्णवी हगवणे, प्रिया फुके प्रकरणात आयोग निष्क्रिय राहिलं.
- अजूनही आयोगात ६ सदस्यांची नियुक्ती झालेली नाही.
- ग्रामीण भागात काम नाही, फक्त शहरांपुरते महिला आयोगाचं काम मर्यादित.
खडसे म्हणाल्या की, “केवळ आकडे दाखवून शून्य प्रलंबित दाखवणं म्हणजे काम नव्हे. आजही अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. आयोगाच्या बैठका सहा महिन्यांनंतर होतात. ग्रामीण भागात ईमेल नाही चालत, महिलांना थेट मदतीची गरज असते.”
“राज्य सरकारने आता निर्णय घ्यावा आणि फक्त संवेदनशील व पूर्णवेळ कार्य करणारी व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असावी,” अशी ठाम मागणी खडसे यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला शाहीर दादा कोंडके पुरस्कार; ‘लय भारी वाटतंय’ म्हणत चाहत्यांचे आभार
- “विराट कोहलीसाठी ट्रॉफी जिंकणार”, कॅप्टन रजत पाटीदार म्हणाला…
- ICC Womens World Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












