🕒 1 min read
क्रिकेट प्रतिनिधी | IPL 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत याचा सीझन पूर्णतः निराशाजनक ठरला आहे. Lucknow Super Giants (LSG) कडून खेळताना त्याने 12 सामन्यांत केवळ 135 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 100 च्या खाली गेला आहे.
LSG च्या प्लेऑफ महत्वाच्या सामन्यात पंत फक्त 7 धावांवर बाद झाला आणि संघाने 6 विकेट्सने पराभव पत्करला. यामुळे संघाच्या नेतृत्वावर आणि पंतच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. भारताचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी पंतच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ऋषभ पंत खेळायला उत्साही वाटत नाही. त्याची बॅटिंग दिशाहीन आहे आणि कॅप्टन्सीही विस्कळीत झाली आहे.”
Rishabh Pant’s IPL 2025 Failure
श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “तो प्रत्येक सामन्यात वेगळ्या पद्धतीने आउट होतोय – रिव्हर्स स्वीप, वाईल्ड स्विंग, अगदी विचित्र खेळी. 30 वर्षांपूर्वी मी असं करायचो, पण आता तो त्याहून वाईट खेळतोय.”
पंतला IPL 2025 च्या मेगा लिलावात तब्बल INR 27 कोटींना विकत घेतले गेले होते. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! पण त्याची कामगिरी LSG साठी कमकुवत दुवा ठरली. श्रीकांत यांनी सुचवलं की पंतला इंग्लंड दौऱ्यापूर्वी विश्रांती द्यावी आणि LSG ने आपली कोअर टीम बदलावी. “या संघाकडे बॉलर्स नाहीत, पुढील हंगामासाठी मोठे बदल हवेत,” असं ते म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025 Final अहमदाबादमध्ये; चंदीगडमध्ये होणार दोन प्लेऑफ सामने
- अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यातील वाद मिटला? सगळं ठीक…!
- रुतुराज फिट… तरी संघाबाहेर? मराठमोळ्या रुतुराज गायकवाडवर MS धोनीच्या CSK चा अन्याय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












