Share

BSF Recruitment | BSF मध्ये नोकरीची संधी; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

BSF Recruitment | Border Security Force

Published On: 

🕒 1 min read

BSF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: दहावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते.

अशात तुम्ही जर दहावी पास उमेदवार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची ठरू शकते. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दहावी पास उमेदवारांसाठी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीबद्दल माहिती सांगणार आहोत.

सीमा सुरक्षा दल ( Border Security Force ) म्हणजेच बीएसएफमध्ये ( BSF Recruitment ) विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदासाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

बीएसएफमध्ये  ( BSF Recruitment ) रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 166 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

उपनिरीक्षक 68 पदे,  हेड कॉन्स्टेबल 85 पदे,कॉन्स्टेबल 13 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी खाली दिलेल्या लिंकमध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.

अर्जाचा नमुना ( Sample application form )

https://drive.google.com/file/d/14_OtQQonzQlaVouEmoK7NYNbM5zyhaek/view

या भरती  ( BSF Recruitment ) प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

हा अर्ज कधी आणि कुठे सादर करायचा? याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची जाहिरात  ( BSF Recruitment ) बघू शकतात.

त्याचबरोबर या जाहिरातीमध्ये तुम्हाला सविस्तर शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, परीक्षा फी, वयोमर्यादा इत्यादीबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

जाहिरात पाहा ( View ad )

https://bit.ly/3Rr8O2I

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

बीएसएफअंतर्गत  ( BSF Recruitment ) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही