Share

BJP vs CONGRESS – ‘५० कोटी अन्‌ मंत्रिपद…भाजपची काँग्रेस आमदारांना ऑफर’

BJP vs CONGRESS – काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून कर्नाटकात ऑपेरशन लोट्‌स’ ची तयारी सुरु असल्याची माहिती कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिली होती. भाजपची टीम कोणत्या आमदारांना भेटत आहे. ‘ऑपेरशन लोट्‌स’साठी आमदारांना काय ऑफर दिली जात आहे. याबाबतची सर्वकाही माहिती आमच्याकडे आलेली आहे. या प्रत्येक घडामोडीची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मला ( उपमुख्यमंत्री शिवकुमार … Read more

Published On: 

BJP vs CONGRESS – काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून कर्नाटकात ऑपेरशन लोट्‌स’ ची तयारी सुरु असल्याची माहिती कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिली होती.

भाजपची टीम कोणत्या आमदारांना भेटत आहे. ‘ऑपेरशन लोट्‌स’साठी आमदारांना काय ऑफर दिली जात आहे. याबाबतची सर्वकाही माहिती आमच्याकडे आलेली आहे. या प्रत्येक घडामोडीची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मला ( उपमुख्यमंत्री शिवकुमार ) आहे.

विधानसभेचे अधिवेशन झाल्यानंतर भाजपच्या कोणत्या टीमने कोणत्या आमदाराशी चर्चा केली, हे आमदारच समोर येऊन सांगतील, असेही उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले होते.

दरम्यान, काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवी गनिगा यांनी केला आहे, त्यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे माजी स्वीय सचिव एन. आर. संतोष यांच्या माध्यमातून आमदारांशी चर्चा केली जात आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या चार आमदारांची भेट घेऊन त्यांना ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवले जात आहे. असा गौप्यस्फोट आमदार रवी गनिगा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही