Share

Weather Update | राज्यात ‘या’ भागात पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. राज्यातील शेतकरी आतुरतेने परतीच्या पावसाची वाट बघत आहे. कारण शेतीतील पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. मात्र, राज्यात पावसानं उघडीत दिली आहे. अशात हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलासादायक माहिती दिली आहे. येत्या तीन दिवसात राज्यात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Hits will … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. राज्यातील शेतकरी आतुरतेने परतीच्या पावसाची वाट बघत आहे.

कारण शेतीतील पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. मात्र, राज्यात पावसानं उघडीत दिली आहे. अशात हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलासादायक माहिती दिली आहे. येत्या तीन दिवसात राज्यात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Hits will start increasing in the state from October 8

राज्यामध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, नाशिक जिल्हा, खान्देश आणि कोकण या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तर पुणे, अहमदनगर, सोलापूर सातारा, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर यानंतर 18 ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा एकदा ऑक्टोबर हिट वाढायला सुरू होणार आहे.

पुढील तीन दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

तर 18 ऑक्टोबर नंतर राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात पहाटेचे तापमान तीन ते चार अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, या उन्हाचा सर्वाधिक तडाखा मराठवाडा आणि कोकण विभागाला बसण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install