NCP | महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र, राज्य सरकारविरोधात घातला शिमगा

NCP | पुणे : कोरोना महामारीला दोन वर्षे झाली. त्यावेळी या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते. यामुळे या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळानंतरही आताही थोडीफार तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. “५० खोके एकदम ओके” मागील ८ वर्षांपासून केंद्र सरकार मार्फत सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. … Read more

Published On: 

NCP | पुणे : कोरोना महामारीला दोन वर्षे झाली. त्यावेळी या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते. यामुळे या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळानंतरही आताही थोडीफार तीच परिस्थिती पहायला मिळत आहे.

“५० खोके एकदम ओके”

मागील ८ वर्षांपासून केंद्र सरकार मार्फत सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर होळी करण्यात आली. अशावेळी “५० खोके एकदम ओके, केंद्र सरकारला महागाईची सुबुद्धी येऊ दे,” अशी घोषणा देखील केल्या आहेत.

“जनतेला महागाईतून बाहेर काढता येईल”- Prashant Jagtap

राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, या महागाईमुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. राज्यातील जनतेला कशा प्रकारे बाहेर काढता येईल याकडे सरकारचे लक्ष नाही. हे राज्यातील जनतेला माहीत असून जनता त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने महागाई कमी करावी अशी सुबुद्धी व्हावी अशीच प्रार्थना आजच्या होळी निमित्ताने देवाकडे केली” असे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही