Immunity System | इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी हळदीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Immunity System | टीम महाराष्ट्र देशा: हळदीचा (Turmeric) वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये केला जातो. हळद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये प्रोटीन, फायबर, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. हळदीचे नियमित सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. हळद सर्दी-खोकला, ताप इत्यादी मोसमी आजारांपासून तुमचे संरक्षण करू शकते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने हळदीचा वापर करू शकतात.

हळदीचे दूध (Haldi Dudh-Immunity System)

दुधामध्ये हळद मिसळून त्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. हळदीमध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल गुणधर्म अनेक प्रकारचे संक्रमण टाळू शकतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एक ग्लास हळदीच्या दुधाचे सेवन करू शकतात. या दुधाचे सेवन केल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

हळद आणि तुळस (Turmeric and basil-Immunity System)

हळदीसोबतच तुळशीमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटी-बॅक्टरियल, अँटी-व्हायरस आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही हळद आणि तुळशीच्या पानांचा काढा बनवून त्याचे सेवन करू शकतात. हा काढा बनवण्यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये पाच-सहा तुळशीची पाने, आले आणि हळद मिसळून ते पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी अर्धे झाल्यावर तुम्हाला त्याचे गाळून सेवन करावे लागेल. याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

हळद आणि लिंबू (Turmeric and lemon-Immunity System)

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबू आणि हळद एकत्र मिसळून प्यायल्याने शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर डिटॉक्सिफाय होते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि आवश्यकतेनुसार मध मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. या पेयाचे नियमित सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतींचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर पाण्यामध्ये केळीचे पाणी उकळून प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for skin-Banana Leaves Water)

पाण्यामध्ये केळीची पाने उकळून प्यायल्याने त्वचा निरोगी राहू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराईस ठेवतात. त्याचबरोबर या पाण्याचे नियमित सेवनाने तुमची त्वचा एलर्जी, पुरळ इत्यादी गोष्टीपासून दूर राहू शकते.

पोट निरोगी राहते (Stomach remains healthy-Banana Leaves Water)

केळीच्या पानांचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते. याच्या नियमित सेवनाने पचनसंस्थेची संबंधित समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही अपचन, ॲसिडीटी, बद्धकोष्टता, पोट फुगणे इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या