Indian Railways | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय रेल्वे विभागामार्फत मोठी भरती प्रक्रिया (Recruitment process) जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय रेल्वे (Indian Railways) यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट लोको पायलट पदाच्या एकूण 238 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार 7 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Indian Railways) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Railways) उमेदवारांना दिनांक 7 एप्रिल 2023 पासून ते 6 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View ad)
https://www.rrcjaipur.in/storeWebFiles/423_566625.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!
- Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज