Skin Irritation | त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय

Skin Irritation | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची जळजळ होणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. त्वचा जास्त कोरडी (Dry Skin) झाल्यामुळे किंवा कोणतेही नवीन क्रीम किंवा लोशन वापरल्यानंतर त्वचेला जळजळ किंवा खाज येण्याची समस्या निर्माण होते. अनेकदा ब्लीच किंवा ब्युटी ट्रीटमेंट केल्यावरही चेहऱ्यावर जळजळ व्हायला लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे क्रीम आणि औषधांचा वापर करतात. मात्र, ही औषधे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात. हे उपाय केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. चेहऱ्यावरील जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय वापरू शकतात.

कोरफड (Aloevera-For Skin Irritation)

चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर थेट चेहऱ्यावर लावावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोरफडीच्या गरामध्ये काही थेंब गुलाब जल मिसळू शकतात. कोरफडीच्या मदतीने तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.

कडुलिंब (Neem-For Skin Irritation)

त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुलिंबामध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पाण्याने अंघोळ देखील करू शकतात. या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील बहुतांश समस्या सहज दूर होऊ शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-For Skin Irritation)

खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेल फक्त त्वचेवरील जळजळ आणि खाज दूर करत नाही तर त्वचेला आर्द्रता देखील देते. यासाठी तुम्हाला जळजळ आणि खाज सुटलेल्या जागी खोबरेल तेलाने मसाज करावी लागेल. दिवसातून तीन ते चार वेळा त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने जळजळ कमी होऊ शकते.

त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर तेलगट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

ग्लिसरीन आणि लिंबाचा रस (Glycerin and lemon juice-For Oily Skin)

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाऊ शकते.

ग्लिसरीन आणि गुलाब जल (Glycerin and rose water-For Oily Skin)

तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब जल फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा ग्लिसरीनमध्ये एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.

ग्लिसरीन आणि मुलतानी माती (Glycerin and Multani Mati-For Oily Skin)

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये ग्लिसरीन मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर साधारण दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने पिंपल्स आणि फ्रिंकल सारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या