Share

Uddhav Thackeray | “शिवसेना आयोगाच्या नाही, तर माझ्या वडिलांनी सुरू केली”; ठाकरेंची निवडणूक आयोगावर जहरी टीका

🕒 1 min read Uddhav Thackeray | रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात विरोधीपक्ष हे सात्ताधारी पक्षावर तर सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्षावर टीका टिप्पणी करत असतात. हे फार काही नवीन नाही. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात नाव आणि चिन्ह यावरून वाद सुरू होता. त्या वादावरून निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात विरोधीपक्ष हे सात्ताधारी पक्षावर तर सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्षावर टीका टिप्पणी करत असतात. हे फार काही नवीन नाही. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात नाव आणि चिन्ह यावरून वाद सुरू होता. त्या वादावरून निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचे प्रमुख  ठाकरे संतापले आहेत. काल (५ मार्च) या दिवशी रत्नागिरीतील खेड येथे त्यांनी सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावरून आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? (Uddhav Thackeray Statement)

“निवडणूक आयोगाने शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे तत्व खोटे आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केली नाही, तर ती माझ्या वडिलांनी केली आहे. तिकडे निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील, मात्र माझे नाही.” अशी  शाब्दिक टीका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केला आहे.

“त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना कोणती हे…”

“मला निवडणूक आयोगाला खास सांगायचे आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना कोणती हे पहायला इकडे या. हा ‘चुनाव लगाओ आयोग’ आहे. हे सत्याचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्यानुसार हे वागणारे आहेत. हे निवडणूक आयोग म्हणण्याच्या लायकीचे नाहीत” अशी बोचरी ठाकरे यांनी केली आहे. यावर आता भाजप पक्षातून काय प्रतिक्रिया उमटतील याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

“निवडणूक आयोगाने शेण खाल्लं” 

ज्या दिवशी निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. अशावेळी उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. अशावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने शेण खाल्लं अशी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची हत्याच होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून लोकशाहीला आदरांजली वहावी आणि आम्ही बेबंदशाही देशात सुरू करतो आहोत हे जाहीर करावं”

Uddhav Thackeray criticize Eknath Shinde Group

“मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे,” असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही