Share

Sanjay Shirsat | “इम्तियाज ही औरंगजेबाची औलाद, आमच्या छातीवर नाचाल तर…”; संजय शिरसाट आक्रमक

🕒 1 min read Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करत आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनात औरंगजेबाचा फोटो लावण्याने जलील चांगलेच चर्चेत आले होते. यावरुन आता शिवसेना (Shivsena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. Sanjay Shirsat Criticize on … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करत आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनात औरंगजेबाचा फोटो लावण्याने जलील चांगलेच चर्चेत आले होते. यावरुन आता शिवसेना (Shivsena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Sanjay Shirsat Criticize on Imtiyaz Jaleel 

“इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याची माहिती मिळत आहे.

“नाव बदलला म्हणून आम्ही आनंद व्यक्त केला. निजामाने प्रत्येकाला उर्दू शिकावे असे सांगितले. आम्ही शिकलो, विरोध केला नाही. आता राज्य आमचं आहे. आता आम्ही जे म्हणणार तेच होणार. आता तुम्ही आमच्या तावडीत आलात. काही लोकांना पोटशूळ उठलं. आब ये शेर आया है, अरे पा** हो बिऱ्याणी खाता आणि पा** राहता. आम्ही या शहरात 22 दंगली पहिल्या आहेत. यांना आम्ही कधीही निपटून घेऊ. राजकारण गेले उडत”, अशी जहरी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

“…मग तू काय बायांच्या मागे जाऊन बसतो का?”

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, “एकच सांगतो गर्व से कहो हम हिंदू है. तो म्हणतो तुमची सत्ता आहे तुम्हीच कबर हलवा. मग तू काय बायांच्या मागे जाऊन बसतो का? निजामाची औलाद असतील ते संभाजी नगरला विरोध करतील. औरंगजेब मेला कुठं आणि आला इथं निजायला. कसा आला त्याकाळात माहीत नाही. आता ओवेसी इकडे येतो बिर्याणी खातो आणि कबरीवर जातो. किती त्रास त्यापेक्षा कबर तिकडे घेऊन जा मोकळे व्हा”

“इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद”

“अमेरिकेने लादेन मारला. त्याची कबर आहे का कुठं? बिर्याणी खाऊन उपोषण सुरुय. वातावरण कधीही बिघडू शकतं, लक्षात घ्या. आता प्रत्येकजण घरावर झेंडा लावणार हे छत्रपती संभाजीनगर. ‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद आहे’. कधी कुणाला मारतील याचा नेम नाही. तुम्ही कोर्टात काय जाता. तिथं मोदी बसले आहेत. चिंता करू नका. मुसलमान असो की कुणीही असो छातीवर नाचले तर आम्ही सहन करणार नाही. आता मार खाणार नाही. मारून घरी जाऊ”, अशा शब्दांत संजय शिरसाट आपली आक्रमकता व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही