Share

Ramdas Kadam | “जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री अन् नेता बाहेर…”; कदमांची जहरी टीका

Ramdas Kadam | मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड (Khed) येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘आपण कोकणातील लोकांना भेटण्यासाठी आलो आहे’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या भाषणानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव … Read more

Published On: 

Ramdas Kadam | मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी रत्नागिरीतील खेड (Khed) येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘आपण कोकणातील लोकांना भेटण्यासाठी आलो आहे’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या भाषणानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना रामदास कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Ramdas Kadam criticize on Aaditya And Uddhav Thackeray

“आहो, उद्धवजी तुम्ही मला सांगा, तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात प्रचंड वादळं आली. कोकणाची किनारपट्टी सगळी उद्धवस्त झाली. तेव्हा शरद पवारांसारखा 82 वर्षांचा वयस्कर माणूस चार दिवस कोकणाला न्याय देण्यासाठी आला. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे नेतेही आले. तेव्हा तुम्ही बापलेक आलात का? का आला नाहीत?”, असं म्हणत रामदास कदमांनी शरद पवारांचं कौतुक तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बापलेकावर टीका केली आहे.

“तेव्हा तुम्ही बापलेक कुठे होता?”

“काल तुम्ही म्हणाले, कोकण माझा बालेकिल्ला आहे. पण कोकणचा माणूस अडचणीत होता. माझा मच्छिमार अडचणीत होता. तेव्हा तुझा कोकण कुठे गेला होता रे बाबा… तेव्हा योगेश कदम याने पुढाकार घेतला. मी स्वत: अजित पवारांना फोन केला. केंद्र सरकारचे निकष बदलून वादळात अडकलेल्या मच्छिमारांना आम्ही बापलेकांनी मदत केली. योगेश कदम रात्रंदिवस काम करत होता. मी आजारी असतानाही दापोलीत येऊन बसलो होतो. तेव्हा तुम्ही बापलेक कुठे होता?”, असेही रामदास कदम म्हणाले आहेत.

“जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री अन् नेता बाहेर…”

“जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि नेता बाहेर… हे पहिल्यांदा घडलं असेल. तुम्ही तुमची हौस भागवून घेत आहात काय? कोकणातील लोकांना भावनात्मक आवाहन करायचं थांबवा. आता हळुहळू महाराष्ट्राच्या जनतेलाही उद्धव ठाकरे काय आहेत, हे समजेल,” असं म्हणत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही