Diabetes | डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Diabetes | टीम महाराष्ट्र देशा: भारतात डायबिटीज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना इजा होणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या शुगरच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने शुगर कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध केलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या आहारात काही भाज्या आणि फळांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. कारण रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंब तुमची मदत करू शकतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकतात.

कडुलिंबाची पाने (Neem leaf-For Diabetes)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही फक्त कडुलिंबाच्या पानांचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सहा कडुलिंबाची पाने धुवून त्याचे सेवन करावे लागेल. नियमित असे केल्याने रक्तातील सारखेची पातळी कमी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.

कडुलिंब पानांचे पाणी (Neem leaf water-For Diabetes)

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंब पानांच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला पाच ते सहा कडुलिंबाची पाने एक ग्लास पाण्यामध्ये पाच मिनिटे उकळून घ्यावे लागेल. हे पाणी अर्धे झाल्यावर तुम्हाला गाळून त्याचे सेवन करावे लागेल. नियमित या पाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीर निरोगी राहते.

कडूलिंब पानांचा रस (Neem leaf Juice-For Diabetes)

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पानाचा रस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला मिक्सर किंवा ग्राइंडरच्या मदतीने कडुलिंबाची पाने बारीक करून त्यामधून रस काढून घ्यावा लागेल. नियमित या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते. त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने शरीराला देखील अनेक फायदे मिळू शकतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने कडुलिंबाच्या पानाचा उपयोग करू शकतात. त्याचबरोबर पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पेयांचा समावेश करू शकतात.

जिरे पाणी (Cumin water-For Slim Waist)

जिरे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाण्याचे सेवन केल्याने पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे रात्रभर भिजवून ठेवावे लागेल. सकाळी हे पाणी पाच मिनिटे उकळून तुम्हाला त्या पाण्याचे सेवन करावे लागेल. नियमित या पाण्याचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते.

लिंबू पाणी (Lemon water-For Slim Waist)

लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. नियमित लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि वजनही झपाट्याने कमी होते. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Back to top button