Body Pain | अंगदुखीमुळे त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Body Pain | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक शरीराच्या वेदना म्हणजेच शरीरदुखीच्या समस्येपासून त्रस्त असतात. अनियमित जीवनशैलीमुळे डोकेदुखी, पाठ दुखी, हात-पाय दुखणे इत्यादी समस्या सामान्य झाल्या आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. हे घरगुती उपाय केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. बॉडी पेनच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

हळद (Turmeric-For Body Pain)

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये आढळून येणारे अँटीइम्प्लिमेंटरी गुणधर्म शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. बॉडी पेनच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

दालचिनी (Cinnamon-For Body Pain)

शरीरातील वेदना कमी करण्यासाठी दालचिनी खूप प्रभावी मानली जाते. दालचिनीमध्ये अँटीइम्प्लिमेंटरी आणि अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे वेदनांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा दालचिनी आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला याचे सेवन करावे लागेल. नियमित याचे सेवन केल्याने तुम्हाला शरीरदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

आले (Ginger-For Body Pain)

बॉडी पेनच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी आले फायदेशीर ठरू शकते. आल्यामध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये आल्याचा तुकडा मिसळून ते पाणी उकळून घ्यावे लागेल. नियमित या पाण्याचे सेवन केल्याने तुमची शरीर दुखीची समस्या कमी होऊ शकते.

अंगदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वरील पद्धतींचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात दुधी भोपळ्याचा रस पिऊन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर डिटॉक्स राहते (The body remains detox-Bottle Gourd Juice)

उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात दुधी भोपळ्याचा रस पिऊन केल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळू शकते आणि शरीर निरोगी राहू शकते. या रसामध्ये 98 टक्के पाणी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. या रसाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात.

पचनसंस्था मजबूत होते (The digestive system is strengthened-Bottle Gourd Juice)

उन्हाळ्यामध्ये अनेकदा ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिऊ शकतात. दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाशी संबंधित आजारही दूर होतात. यामध्ये आढळणारे फायबर अन्न पचवण्यास मदत करतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.