Coffee | त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कॉफीसोबत करा ‘या’ गोष्टींचा वापर

Coffee | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक लोक कॉफीचे सेवन करतात. कारण कॉफी प्यायल्याने झोप आणि थकवा दूर होतो. त्याचबरोबर कॉफी आपल्या त्वचेसाठी (Skin) देखील खूप फायदेशीर असते. त्यामुळे अनेक सौंदर्य प्रसाधन कंपन्या त्यांच्या स्किन केअर उत्पादनांमध्ये कॉफीचा वापर करतात. कॉफीच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर केल्या जाऊ शकतात. कॉफीच्या मदतीने चेहऱ्यावरील काळे डाग दूर करता येऊ शकतात. कॉफीचा खालील पद्धतीने वापर करून चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.

मध आणि कॉफी (Honey & Coffee For Skin Care)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर शकतात.

दूध आणि कॉफी (Milk & Coffee For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कॉफी आणि दूध उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा कॉफी पावडरमध्ये आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित चेहऱ्यावर लावावे लागेल. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. आठवड्यातून एक वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा डागमुक्त होऊ शकते.

ऑलिव्ह ऑइल आणि कॉफी (Olive oil & Coffee For Skin Care)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल आणि कॉफीचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा कॉफी पावडरमध्ये आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने कॉफीचा वापर करू शकतात. त्याचबरोबर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकतात.

अंडी (Egg-For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकतात. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते, जे केसांची काळजी घेण्यास मदत करते. नियमित एक ते दोन अंडी खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते. यासाठी तुम्ही उकडलेल्या अंड्याचे सेवन करू शकतात.

दूध (Milk-For Hair Care)

दुधामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर दुधाचे नियमित सेवन केल्याने केसांसोबत शरीर देखील चांगले राहू शकते. नियमित दुधाचे सेवन केल्याने केस मजबूत होतात आणि केस गळती थांबते. त्याचबरोबर दुधाचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस चालना  मिळते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुधाचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.