Indian Army | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय लष्करामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड (Head Quarters Southern Command), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
भारतीय लष्कराच्या (Indian Army) हेड क्वार्टर सदर्न कमांड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये कुक 11जागा, कारपेंटर 01जागा, MTS (मेसेंजर) 05 जागा, वॉशरमन 02 जागा, MTS (सफाईवाला) 04 जागा, इक्विपमेंट रिपेयर 0 जागा, टेलर 01 जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Indian Army) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Army) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 23 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
प्रभारी अधिकारी, सदर्न कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र), पिन – 411001.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1pMyBOefHyHrJ5QQsVsSFeTxUlxvQ9w0w/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Immunity System | इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी हळदीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Indian Railways | भारतीय रेल्वे यांच्यामार्फत ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज