Bottle Gourd | उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात दुधी भोपळ्याच्या रस पिऊन केल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Bottle Gourd | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळ्याचा रस (Bottle Gourd Juice) पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दुधी भोपळ्याच्या रसामध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. यासाठी सकाळी व्यायाम केल्यानंतर तुम्ही प्रोटीन शेकच्या ऐवजी दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करू शकतात. व्यायामानंतर दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर डिटॉक्स राहते (The body remains detox-Bottle Gourd Juice)

उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात दुधी भोपळ्याचा रस पिऊन केल्याने शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळू शकते आणि शरीर निरोगी राहू शकते. या रसामध्ये 98 टक्के पाणी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. या रसाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात.

पचनसंस्था मजबूत होते (The digestive system is strengthened-Bottle Gourd Juice)

उन्हाळ्यामध्ये अनेकदा ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिऊ शकतात. दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाशी संबंधित आजारही दूर होतात. यामध्ये आढळणारे फायबर अन्न पचवण्यास मदत करतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Bottle Gourd Juice)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर उन्हाळ्यात सकाळी दुधी भोपळ्याचा रस पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दुधी भोपळ्याच्या रसामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये फॅटचे प्रमाण देखील कमी आढळते. त्यामुळे हा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रणात राहते.

उन्हाळ्यामध्ये सकाळी दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी तुम्ही हळदीचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

हळदीचे दूध (Haldi Dudh-Immunity System)

दुधामध्ये हळद मिसळून त्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. हळदीमध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल गुणधर्म अनेक प्रकारचे संक्रमण टाळू शकतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एक ग्लास हळदीच्या दुधाचे सेवन करू शकतात. या दुधाचे सेवन केल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

हळद आणि तुळस (Turmeric and basil-Immunity System)

हळदीसोबतच तुळशीमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटी-बॅक्टरियल, अँटी-व्हायरस आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही हळद आणि तुळशीच्या पानांचा काढा बनवून त्याचे सेवन करू शकतात. हा काढा बनवण्यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये पाच-सहा तुळशीची पाने, आले आणि हळद मिसळून ते पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी अर्धे झाल्यावर तुम्हाला त्याचे गाळून सेवन करावे लागेल. याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.