Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited SAIL) यांच्या आस्थापनेवरील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
विविध पदांच्या एकूण 244 रिक्त जागा (Total 244 vacancies for various posts)
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 244 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सिनियर कंसल्टंट 10 जागा, मेडिकल ऑफिसर (MO) 10 जागा, मेडिकल ऑफिसर (OHS) 03 जागा, मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण) 03 जागा, असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) 04 जागा, ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी 87 जागा, माइनिंग फोरमन 09 जागा, सर्व्हेअर 06 जागा, माइनिंग मेट 20 जागा, अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV) 34 जागा, माइनिंग सिरदार 08 जागा, अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन 50 जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)
https://sail.ucanapply.com/otr?app_id=UElZMDAwMDAwMQ==
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1Ap7aHcvpVy_Yd6QcZEFk7RpX0FNMq4Jy/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Coffee | त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कॉफीसोबत करा ‘या’ गोष्टींचा वापर
- Indian Army | भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांडमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचन जारी
- Immunity System | इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी हळदीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Indian Railways | भारतीय रेल्वे यांच्यामार्फत ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज