Slim Waist | पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Slim Waist | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक बराचं वेळ जिममध्ये घाम गाळतात. पण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकतात. या पेयांचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पेयांचा समावेश करू शकतात.

जिरे पाणी (Cumin water-For Slim Waist)

जिरे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाण्याचे सेवन केल्याने पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे रात्रभर भिजवून ठेवावे लागेल. सकाळी हे पाणी पाच मिनिटे उकळून तुम्हाला त्या पाण्याचे सेवन करावे लागेल. नियमित या पाण्याचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते.

लिंबू पाणी (Lemon water-For Slim Waist)

लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. नियमित लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि वजनही झपाट्याने कमी होते. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

बडीशेप पाणी (Fennel water-For Slim Waist)

बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी मदत करू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवावी लागेल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे पाणी उकळून आणि गाळून घ्यावे लागेल. या पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर अंगदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

हळद (Turmeric-For Body Pain)

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये आढळून येणारे अँटीइम्प्लिमेंटरी गुणधर्म शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. बॉडी पेनच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

दालचिनी (Cinnamon-For Body Pain)

शरीरातील वेदना कमी करण्यासाठी दालचिनी खूप प्रभावी मानली जाते. दालचिनीमध्ये अँटीइम्प्लिमेंटरी आणि अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे वेदनांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा दालचिनी आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला याचे सेवन करावे लागेल. नियमित याचे सेवन केल्याने तुम्हाला शरीरदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या