Sanjay Raut । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झालेला सत्कार आणि पवारांनी शिंदेंबद्दल केलेल्या कौतुकांमुळे महाविकास आघाडीमध्ये एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पवारांच्या या कृतीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरे गटाने पहिल्यांदाच थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडल्याने महाविकास आघाडीतील दरी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी फक्त शरद पवार नाही तर एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. यावरून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी देखील राऊतांवर बोचरी टीका केली.
“मराठा समाज सर्व पाहत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श लाथाडून केवळ हिंदुत्वाचाच नाही तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान करणारे लोकांना मराठा सन्मान काय समजणार? ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला जनाधार आणि सन्मान गमावला आहे ते इतरांचा सन्मान केल्यामुळे त्रस्त आहेत,” असा निशाणा ज्योतिरादित्य शिंदे यांनी साधला.
Sanjay Raut post on X
याला आता संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत प्रत्युउतर दिले आहे. संजय राऊत X वर लिहितात, “ग्रेट! महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावे पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. महादजी यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातले नाही,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. (Sanjay Raut on Eknath Shinde)
महत्त्वाच्या बातम्या :