Sanjay Raut | मुंबई: आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रामध्ये 20 जून 2022 रोजी विधान परिषदेची निवडणूक झाली होती. त्यादिवशी एकनाथ शिंदेंसह काही आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं होतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
June 20 is the darkest day in history for democracy – Sanjay Raut
माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “20 जून हा लोकशाहीसाठी देशाच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस आहे. या दिवशी लोकशाहीची हत्या झाली होती. शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी बेईमानी केली.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut), “आपण व्हॅलेंटाईन्स डे, योगा डे साजरा करतो. त्याचप्रमाणे गद्दार दिन देखील साजरा व्हायला हवा. जगातल्या सर्व गद्दारांसाठी हा दिवस साजरा करायला हवा. या दिवशी लोकांनी गद्दारांना जोडे मारायला हवे किंवा त्यांचं स्मरण करायला हवं. म्हणून मी युनायटेड नेशनला याबाबत पत्र लिहिलं आहे.
June 20 should be declared World Traitor Day – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी 20 जून जागतिक गद्दार दिन घोषित करावा अशी मागणी केली आहे. जागतिक गद्दार दिन घोषित केल्यानंतर जगभरातील सर्व गद्दारांना एक व्याजपीठ मिळेल, असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्रात 20 जून 2022 रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती. त्याच दिवशी एकनाथ शिंदेंसह काही आमदार सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. तिथून ते आमदार गुवाहाटीला रवाना झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | 20 जुन जागतिक गद्दार दिन म्हणून घोषित करा; संजय राऊतांचं युनोला पत्र
- Nitesh Rane | 27 जुलै देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा – नितेश राणे
- Ravindra Jadeja | BCCI चा मोठा निर्णय! रोहित आणि विराटनंतर जडेजाला मिळणार डच्चू?
- Crime News | आजार बरा करण्याचं कारण अन् भोंदूबाबाकडून महिलेचा शारीरिक छळ
- Ambadas Danve | ‘गद्दार दिन’ साजरा करण्यात यावा, यासाठी अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र