Prakash Ambedkar | मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “राजकारणात कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आमच्या नेतृत्वाचा अंत होणार तसा एक दिवस नरेंद्र मोदी यांच्याही नेतृत्वाचा अंत होणार आहे. पण भाजपा सध्या देशातील लीडरशिप संपवण्याच्या मार्गावर आहे. लोकशाहीसाठी अत्यंत घातक अशी ही वृत्ती आहे. या वृत्तीला विरोध करण्यासाठी, लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.”
“महाराष्ट्राची सत्ता १६९ कुटुंबात होती. त्यात आता १० कुटुंबात वाढ झाली आहे. नातेवाईकांचं राजकारण वाढल्याने गरिबांचं राजकारण बाजूला पडत गेलं. त्यामुळे भांडवशाही आणि लुटारुंची सत्ता सुरु झाली, असंही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्याने निवडणुकीत बदलाचं राजकारण सुरुवात होणार आहे. जनता दलाचा जाहीरनामा आजही काढला तर शेवटं लिहलं होतं, आम्ही मंडल कमिशन लागू करू. दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष मंडल कमिशनवर पडला, अशी परिस्थिती आहे. सामाजिक प्रश्नाला हात घातला जातो, तेव्हा समाजव्यवस्थेमधील गणिते बदलली जातात.”
महत्वाच्या बातम्या :
- BJP | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत भाजपने सुरू केली कसबा पोटनिवडणुकीची तयारी; काय आहे भाजपची रणनिती?
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची घोषणा; म्हणाले, “राजकारणातील वाईट…”
- Exercise Tips | व्यायामानंतर थकवा दूर करण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Sanjay Raut | “‘त्या’ दोन विचारांची युती हे बाळासाहेब ठाकरे यांचं जूनं स्वप्न”; युतीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
- Abhijeet Bichukale | “त्याच्या गर्भसंस्कारातच गांजा दिलाय”; अभिजीत बिचुकलेंचा मनसे नेत्यावर पलटवार
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले