Share

Exercise Tips | व्यायामानंतर थकवा दूर करण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन

🕒 1 min readExercise Tips | टीम महाराष्ट्र देशा: शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहण्यासोबतच मूड फ्रेश राहतो. बरेच लोक तासंतास व्यायाम केल्यानंतर पाणी आणि ज्यूसचे सेवन करतात. व्यायामानंतर शरीराला एनर्जीची गरज असते. त्यामुळे प्रोटीनचे सेवन शरीराला फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही व्यायामानंतर काही विशिष्ट … Read more

Published On: 

🕒 1 min read

Exercise Tips | टीम महाराष्ट्र देशा: शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहण्यासोबतच मूड फ्रेश राहतो. बरेच लोक तासंतास व्यायाम केल्यानंतर पाणी आणि ज्यूसचे सेवन करतात. व्यायामानंतर शरीराला एनर्जीची गरज असते. त्यामुळे प्रोटीनचे सेवन शरीराला फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही व्यायामानंतर काही विशिष्ट गोष्टींचे सेवन करू शकतात. या गोष्टीचे सेवन केल्याने तुम्हाला व्यायामानंतर एनर्जी मिळण्यास मदत होईल. व्यायामानंतर तुम्ही पुढील गोष्टींचे सेवन करू शकतात.

बदाम

बदाम आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये प्रोटीन्स, आयरन, कॅल्शियम, विटामिन ई इत्यादी गुणधर्म माफक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे व्यायामानंतर बदाम खाल्ल्याने शरीराला माफक प्रमाणात प्रोटीन आणि ऊर्जा मिळते. तुम्ही दररोज व्यायामानंतर तीन ते चार बदामाचे सेवन करू शकतात.

काजू

काजू आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. काजूमध्ये मुबलक प्रमाणात आयरन, प्रोटीन, फायबर आणि विटामिन सी आढळून येते. जिम किंवा व्यायामानंतर तुम्ही काजूचे सेवन करू शकतात. कारण काजू खाल्ल्याने शरीराचा थकवा सहज दूर होतो.

अक्रोड

नियमित अक्रोडाचे सेवन केल्याने शरीर ऊर्जावान राहते. कारण अक्रोडामध्ये माफक प्रमाणात आयरन, कॅल्शियम, फायबर आणि फोलेट उपलब्ध असते. व्यायामानंतर अक्रोड खाल्ल्याने स्नायू मजबूत होऊन शरीर निरोगी राहू शकते. व्यायामानंतर तुम्ही भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करू शकतात.

शेंगदाणे

शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, आयरन आणि विटामिन सी आढळून येते. त्यामुळे व्यायामानंतर शेंगदाण्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळू शकते. याचे सेवन केल्याने हाडेही मजबूत होतात.

व्यायाम केल्यानंतर वरील गोष्टींची सेवन केले जाऊ शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला या गोष्टींपासून कुठल्याही प्रकारची एलर्जी नसावी. त्यामुळे वरील माहिती लागू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच या गोष्टींचे सेवन करा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या