Share

Uddhav Thackeray | “त्याच घाटावर या हराXXXX राजकीय चिता पेटेल आणि…”; बाळासाहेबांना अभिवादन करत ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

🕒 1 min read Uddhav Thackeray | मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काय म्हटलंय ‘सामना’त? सामनात म्हटलंय की, “शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलंय ‘सामना’त?

सामनात म्हटलंय की, “शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. शिवसेनेच्या नावावर उतलेले-मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल.”

“मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरा*** राजकीय चिता पेटेल. हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली असेल”, अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे.

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? अशी चर्चा रंगली आहे.

अशातच सामनातून या तैलचित्र अनावरण सोहळ्यावर देखील जोरदार टीका करण्यात आली आहे. विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंगच आहे, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आला आहे. ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेईमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणतं चित्रं रंगवत आहात? असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या