Indian Navy Recruitment | भारतीय नौदलात नोकरीची संधी! लेखी परीक्षेशिवाय होणार भरती

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Indian Navy Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नौदल इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही. या भरती प्रक्रियेमध्ये एसएसबी इंटरव्यू (SSB Interview) च्या माध्यमातून उमेदवार निवडले जाणार आहेत. या पदांसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. भारतीय नौदलामध्ये एसएससी एक्झिटिव्ह (SSC Executive) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

भारतीय नौदलाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार किमान MSc/ BE/ B Tech/ M Tech किंवा MCA with BCA/BSc पदवीधारक असावा. ही पदवी उमेदवारांनी किमान 60 टक्क्यांनी पास केलेली असावी. एनसीसी उमेदवारांना या कटऑफमध्ये पाच टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

या प्रक्रियेमध्ये 70 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला त्यांच्या पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट करण्यात येईल. त्यानंतर त्यांना एसएसबी इंटरव्यूसाठी बोलवण्यात येईल. यामध्ये मिळालेल्या गुणांवर फायनल उमेदवारांची लिस्ट तयार करण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

भारतीय नौदलाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe