Ayurvedic Tips | ‘या’ आयुर्वेदिक औषधी आहेत स्टॅमिना बूस्टर, करून बघा ट्राय

Ayurvedic Tips | टीम महाराष्ट्र देशा: तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो का? जर होय, तर ते स्टॅमिना (Stamina) कमी असल्याचे लक्षण असू शकते. स्टॅमिना कमी असल्यामुळे थोडेसे जरी काम केले, तरी थकवा जाणवायला लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराच्या अभावामुळे स्टॅमिना कमी होतो. त्याचबरोबर पाण्याची कमतरता आणि व्यवस्थित झोप न लागल्याने देखील स्टॅमिना कमी होतो. स्टॅमिना वाढवण्यासाठी लोक महागड्या एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात, तर अनेकजण औषधी घेतात. मात्र, तुम्ही आयुर्विक पद्धतींचा वापर करून तुमचा स्टॅमिना वाढू शकतात. या पद्धतींचा अवलंब केल्याने तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. त्यामुळे या पद्धती स्टॅमिना वाढवण्यासाठी योग्य ठरू शकतात. स्टॅमिना वाढवण्यासाठी पुढील औषधी वनस्पती मदत करू शकतात.

अश्वगंधा

आयुर्वेदामध्ये अश्वगंधाला खूप महत्त्व दिले जाते. अश्वगंधामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिडंट आढळतात. ऑक्सिडंटमुळे शरीराची ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे अश्वगंधाचे सेवन केल्याने स्टॅमिना वाढू शकतो. यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी एक चमचा अश्वगंधा पावडर दुधामध्ये मिसळून प्यावी लागेल. नियमित याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होईल.

शतावरी

शतावरीचा उपयोग अनेक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. शतावरीचे सेवन केल्याने स्टॅमिना आणि एनर्जी वाढण्यास मदत होते. कारण यामध्ये माफक प्रमाणात ऑक्सिडंट आढळून येतात. शतावरीच्या मदतीने एनर्जी वाढवण्यासाठी तुम्हाला दुधासोबत शतावरी पावडरचे सेवन करावे लागेल.

शिलाजीत

प्राचीन काळापासून शिलाजीतचा उपयोग स्टॅमिना आणि एनर्जी वाढवण्यासाठी केला जातो. शिलाजीतमध्ये कामोत्तेजक गुणधर्म आढळून येतात, जे लैंगिक शक्ती वाढवण्यास मदत करतात. शिलाजीतचे सेवन केल्याने स्टॅमिना आणि एनर्जी वाढू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या