Share

Shah Rukh Khan | ‘पठाण’ रिलीज होण्यापूर्वीच शाहरुखच्या मन्नत बाहेर चाहत्यांचा मेळावा, पाहा VIDEO

🕒 1 min readShah Rukh Khan | मुंबई: बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन न करताही हा चित्रपट चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटामुळे बराच वाद-विवाद निर्माण झाला होता. काही हिंदू संघटनांनी शाहरुख खानचे पुतळे आणि पोस्टर देखील जाळले होते. तर, काही संघटनांनी शाहरुखला जिवंत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Shah Rukh Khan | मुंबई: बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन न करताही हा चित्रपट चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटामुळे बराच वाद-विवाद निर्माण झाला होता. काही हिंदू संघटनांनी शाहरुख खानचे पुतळे आणि पोस्टर देखील जाळले होते. तर, काही संघटनांनी शाहरुखला जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. एवढं सगळं होऊनही शाहरुख खान आजही बॉलीवूडचा बादशाह आहे. तो आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

देशातच नव्हे तर जगभरात शाहरुख खानची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे. शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, यावेळी 22 जानेवारी रोजी मन्नतच्या समोर चाहत्यांच्या मेळावा भरला होता. चाहते किंग खानला ‘पठाण’ चित्रपटाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.

शाहरुख खानने त्यांच्या चाहत्यांना निराश केले नाही. चाहत्यांना भेटण्यासाठी तो मन्नच्या टेरेसवर आला होता. शाहरुखला पाहताच चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष सुरू केला होता. त्यानंतर त्याने जमलेल्या चाहत्यांचे आभार मानले. चाहत्यांचे प्रेम पाहून किंग खान भारावून गेला होता. चाहत्यांच्या या गर्दीमुळे सर्वत्र वाहतूक ठप्प झाली होती. शाहरुख खानने सोशल मीडियावर वाहतूक व्यवस्थापनाची माफी मागितली आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

25 जानेवारी 2023 रोजी ‘पठाण’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. तर या चित्रपटामध्ये शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान तब्बल चार वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या